भूम (प्रतिनिधी)-  प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी भूम शहरासह तालुक्याचे ग्राम दैवत असणाऱ्या श्री क्षेत्र अलमप्रभू देवस्थानचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 13 डिसेंबर ते सोमवार दिनांक 15 डिसेंबर या दरम्यान या देवस्थानचा यात्रा महोत्सव पार पडणार आहे. या यात्रा महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या यात्रा महोत्सवादरम्यान दररोज भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी हभप उखळीकर महाराज यांचे कीर्तन नगर पालिकेसमोरील प्रांगणात रात्री साडेआठ वाजता आयोजित केले आहे. रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी नाटक हीच खरी फॅमिली ची गंमत चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन तर संध्याकाळी लावण्य मदन मंजिरी या लावण्याच्या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम श्री गुरुदेवदत्त हायस्कुल येथे दररोज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चालू होणार आहेत. सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी महाप्रसादाने या यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. या यात्रेसाठी शहरासह ग्रामीण भागातील भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या दरम्यान लहान मोठया साठी खेळणी आलेली असतात. तर महिला वर्गांसाठी दुकाने थाटलेली आहेत. या तीन दिवसांमध्ये लाखो भाविक भक्त श्री क्षेत्र अलमप्रभू देवस्थान येथे दर्शनासाठी हजेरी लावतात.

 
Top