तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर 23 डिसेंबरपासून श्री शिवमहापुराण कथा व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

23 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत हा किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते बारा पर्यंत हभप नवनाथ महाराज चिखलीकर, हभप पांडुरंग महाराज रेड्डी, हभप गणेश महाराज जोगदंड, हभप परमेश्वर महाराज सोजे, हभप माधव महाराज कुरे, हभप धनराज महाराज मोहिते, हभप दत्तात्रय महाराज हुके, हभप मेघराज महाराज पुजारी, हभप सतिष महाराज कदम यांची किर्तने होणार असून सायंकाळी नऊ ते अकरा पर्यंत हभप समाधान महाराज शर्मा, हभप उमेश महाराज दशरथे, हभप निवृत्ती महाराज देशमुख, हभप चैतन्य महाराज देगलूरकर, हभप अमृत महाराज जोशी, हभप शिवाजी महाराज बावस्कर, हभप संदिपान महाराज शिंदे,हभप ज्ञानेश्वर महाराज कदम, हभप अक्रूर महाराज साखरे यांची किर्तने होणार आहेत. तर 1 जानेवारीला सकाळी सात ते नऊ पर्यंत दिंडी नगर प्रदक्षिणा व सकाळी दहा ते बारा पर्यंत काल्याचे किर्तन हभप रघुनंदन महाराज पुजारी यांचे होणार आहे. तसेत दररोज दुपारी एक ते पाच पर्यंत हभप आकाशकृष्णा महाराज शास्त्री (श्रीधाम वृंदावन) यांचे श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 
Top