भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील धाराशिव रस्त्यावर शंकरराव पाटील महाविद्यालयाजवळ अवघ्या चार तासांच्या अंतरात ऊसाने भरलेल्या दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या पलटी झाल्याने एक मोटारसायकल व एका चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र, या दोन्ही अपघातांत कोणतीही जीवितहानी न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथून एमएच 13 बीआर 316 क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून ऊस भरून चालक इडा येथील बानगंगा साखर कारखान्याकडे निघाला होता. सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सदर ट्रॅक्टर धाराशिव रस्त्यावरील शंकरराव पाटील महाविद्यालयाजवळ आला असता, अचानक मोटारसायकलवरून येणारे दोन युवक ट्रॅक्टरसमोर आडवे गेले. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

 
Top