धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने राज्यात संविधान अमृत महोत्सवी जागृती अभियानांतर्गत भारतीय संविधान जागृती प्रश्नमंजूषा2025 हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाबाबतच्या सविस्तर सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा), महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग यांच्या अध्यक्षतेखाली 12 डिसेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय भवन,नागपूर येथे बैठक पार पडली.
भारतीय संविधान जागृती प्रश्नमंजूषा2025 मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यासाठी www.yuvacareer.com <http://www.yuvacareer.com> ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाईटवर अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे.यामध्ये विविध प्रशिक्षण संस्था,अधीक्षक वसतिगृहे, तंत्रनिकेतन,अल्पसंख्याक शाळा, मदरसे इत्यादींचा समावेश आहे.
या पोर्टलवर दिनांक 10.12.2025 पासून नोंदणी सुरू असून,दिनांक 31.12.2025 पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. www.yuvacareer.com <http://www.yuvacareer.com> या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर त्याचा अहवाल जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.