धाराशिव (प्रतिनिधी)- दर वर्षीप्रमाणे 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो.यावर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट संकलनाबाबत मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून वीरपत्नी, वीरमाता,वीरपिता यांचा सत्कार, तसेच माजी सैनिकांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप केले जाणार आहे.त्याचबरोबर विशेष गौरव पुरस्कार प्राप्त पाल्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. माजी सैनिक,वीरपत्नी,वीरमाता, वीरपिता व त्यांचे अवलंबित यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.