धाराशिव (प्रतिनिधी)- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी दिनांक 03/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर प्रारुप मतदार यादीबाबत काही आक्षेप किंवा त्रुटी असल्यास,दिनांक 03 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.

प्रारुप मतदार यादीसंबंधी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी मतदान केंद्रनिहाय पदनिर्देशित अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार,आपल्याला काही दावे किंवा हरकती सादर करावयाच्या असल्यास,अर्जाचा विहित नमुना क्रमांक 18,07 आणि 08 मध्ये संबंधित मतदान केंद्रावर नियुक्त अधिकाऱ्यांकडे दिनांक 18 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत सादर कराव्यात. 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीचे अवलोकन करून, दिनांक 18 डिसेंबर 2025 पर्यंत दावे व हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 
Top