धाराशिव (प्रतिनिधी)- दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग कल्याण विभागाचा परिचय, विभागाच्या योजना,कार्यक्रम, धोरणे, दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले कायदे, नियम,दिव्यांग कल्याण आयुक्तालय, राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि संबंधित अधिनस्त कार्यालये यांची रचना,स्वरूप, भूमिका,जबाबदाऱ्या व कार्ये इत्यादीबाबत दिव्यांगामध्ये जागृती होण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा नियोजन समिती सभागृह,धाराशिव येथे केले आहे.

या कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींचे हक्क,स्पेशल कोर्ट,दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कलम 80 नुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांचे अधिकार,शिक्षण,पुनर्वसन याबाबत विविध विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहे.

 
Top