धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे बुधवारी दि. 26 नोव्हेंबर धाराशिवमध्ये भव्य जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
शिंदे यांचे धाराशिव शहरात आगमन सायं. 6 वाजता येणार असून, ते आझाद चौकातील जाहीर सभेला संबोधित करतील. ही सभा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन खलिफा कुरेशी यांच्या प्रचारार्थ तसेच पक्षाचे 30 उमेदवार व दोन पुरस्कृत उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी धाराशिवकरांना आवाहन केले आहे की,26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाच्या उमेदवारांना बळ द्यावे. धाराशिवमध्ये होणारी ही सभा आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या प्रचाराचा महत्त्वाचा टप्पा मानली जात असून, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या पहिल्या सभेमुळे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
