धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र विनाविलंब शुल्क काढता येणार आहे. या संदर्भात विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत पदवी प्रमाणपत्रांना विलंब शुल्क लागणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र विना विलंब शुल्क काढण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपली प्रमाणपत्रे काढून मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करावी,असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केले आहे.