धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची आज देखील महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्राचा विकास होत असला तरी देखील महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते व ज्यांना उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची आज देखील गरज असल्याचे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्रबंधक नेताजी साठे यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र धाराशिव येथील आयोजित कार्यक्रमात केले.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र धाराशिव येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा सह विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख उपस्थित होते. यावेळी डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की, यशवंतराव चव्हाण साहेब हे उत्कृष्ट संसदपटू उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व होते. ते रसिक व साहित्यिक होते त्यांनी युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ ऋणानुबंध या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याचे वाचन होणे आज काळाची गरज आहे. सदर कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक प्रा. विवेकानंद चव्हाण, केंद्र सहाय्यक ज्ञानेश्वर बारवकर, प्रा. सुदर्शन गुरव, प्रसिद्धीप्रमुख प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे आदीसह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
