उमरगा (प्रतिनिधी)- शनिवार दिनांक 01 नोव्हेंबर 2025 रोजी उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व संशयित मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भपिशवीचा कर्करोग, अशा संशयित रुग्णांची जिल्हा परिषद आरोग्य विभाग कॅन्सर व्हॅनद्वारे 122 रुग्णाची तपासणी करून घेण्यात आली.
डॉ. सतिश हरिदास जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. उमाकांत बिराजदार तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. नूर चिद्रे वैद्यकीय अधिकारी, डॉ. तांबोळी स्त्रीरोग तज्ञ, डॉ. स्वप्नाली लामतुरे दंत चिकिस्तक, अश्विनी केंद्रे अधिपरिचारिका, अमृता पाटील औषध निर्माण अधिकारी, विकासदाजी सूर्यवंशी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, शुभांगी स्वामी आरोग्य सहाय्यिका, बाळासाहेब जाधव काजल जाधव आरोग्य सेविका आरोग्य सेवक, मिलिंद पाटील, विजू ठाकूर वाहन चालक, शिवशंकर कांबळे कॅन्सर वाहन चालक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक आरोग्य सेविका बीएफ सर्व आशा अशा उपस्थित होते.
