मुरुम (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व कर्मवीर जगदाळे मामा महाविद्यालय, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धाराशिव झोनच्या मैदानी स्पर्धा दि. 11/12/2025 रोजी तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे घेण्यात आल्या.
या मैदानी स्पर्धेमध्ये श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूमच्या विध्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामध्ये राठोड अजित बाबू याने 400 मीटर धावणे प्रथम, राठोड कृष्णा संजय 5000 मीटर धावणे तृतीय आणि कुमारी हाक्के प्रतीक्षा विश्वभर 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक प्राप्त केला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, सदस्य शरण पाटील यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर प्राचार्य. डॉ अशोक सपाटे, उपप्राचार्य, डॉ. चंद्रकांत बिराजदार व सर्व प्राध्यापकांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन केले. या विध्यार्थ्यांना प्रा. गणापुरे राजेंद्र यांनी मार्गदर्शन केले.
