धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनिल नागणे (तुळजापूर) तर सचिवपदी संतोष दत्ता कदम (कळंब) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सोपानराव शेजवळ यांनी निवडीचे पत्र नूतन अध्यक्ष नागणे व कदम यांना दिले आहे.

शस्त्रांग मार्शल आर्ट खेळाचा प्रचार प्रसार करणे, शासनाच्या माध्यमातून जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणे,  मुलींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आयोजित करणे असा मानस नवनियुक्त अध्यक्ष सुनिल नागणे यांनी व्यक्त केला. तसेच संघटनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून उत्कृष्ट खेळाडू घडविणार असल्याचेही नूतन जिल्हाध्यक्ष नागणे यांनी सांगितले. या निवडीचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे यांनी तसेच तुळजापूर, कळंब तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.

 
Top