वाशी (प्रतिनिधी)-  वाशी (तांदूळवाडी) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडने गाळप हंगाम 2024-25 मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. कारखान्याने ऊसाचा दुसरा हप्ता प्रति मेट्रिक टन 200 प्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. यामुळे गाळप हंगाम 2024-25 चा अंतिम ऊस भाव प्रति मेट्रिक टन 2800 निश्चित झाला आहे.

माजी मंत्री, तथा भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू वर्षी भूम-परंडा-वाशी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन आणि शेतकरी हिताचा विचार करून, हा दुसरा हप्ता त्वरित वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत आणि व्हाईस चेअरमन केशव सावंत यांनी दिली. भैरवनाथ शुगरने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे आणि आर्थिक अडचणीच्या काळात शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे राहण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम 2025-26 साठी देखील आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज जोमाने सुरू आहे. त्यामुळे, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा आणि परिपक्व ऊस गाळपासाठी भैरवनाथ शुगरलाच पुरवावा आणि कारखान्याच्या यशात आपले योगदान द्यावे. असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन  केशव सावंत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  केले आहे. 

 
Top