धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सबका साथ, सबका विकास उद्दिष्ट दिले आहे.नळदुर्ग शहराचा कायापालट करण्याचे आपले जे प्रयत्न चालू आहेत  ते साध्य करण्यासाठी आपल्याला सबका विश्वास,सबका विश्वास आवश्यक आहे. त्यासाठीच आपण नळदुर्ग पालिकेसाठी समाजाच्या प्रत्येक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आजच्या प्रचार शुभारंभ रॅलीत मोठ्या संख्येने सगळ्या जाती धर्मातील नागरिकांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग हिच आपली खरी ताकद असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

नळदुर्ग पालिका निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भव्य पदयात्रा तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहर विकासाची सध्या सुरु असलेली घोडदौड पुन्हा कायम सुरु ठेवण्यासाठी नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला मोठया मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जाहीर सभेत बोलतांना केले. या सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे शहरातील वातावरण भाजमय झाल्याचे दिसुन आले. प्रारंभी बस्थानकासमोरील संविधान चौक ते किल्लागेट पर्यंत आमदार राणाजगजितसिंह यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये निवडणुकीतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज धरणे, यांच्यासह सर्व २० नगरसेवकपदांचे उमेदवार, भाजपचे सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांची संख्याही मोठी होती. या रॅलीला अभुतपुर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रॅली संविधान चौकापासुन निघाल्यानंतर वाजत, गाजत लोकमान्य वाचनालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शास्त्री चौक, भवानी चौक, चावडी चौक, क्रांती चौक मार्गे किल्ला गेट येथील जाहीर सभेच्या ठिकाणी आल्यानंतर रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यानंतर जाहीर सभा पार पडली. रॅली सरु असतांना रस्त्यावरील मंदिर व दर्गाहमध्ये जाऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह बसवराज धरणे व सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी दर्शन घेतले.



आता नळदुर्गला दररोज मुबलक.पाणीपुरवठा

नळदुर्ग शहरात ४८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही काम पूर्ण होईल. त्यानंतर शहरवासियांना दररोज नियमित स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे. १५० कोटीपेक्षा अधिक निधी खर्चून शहरात रस्ते, गटारी, पथदिवे, व इतर मुलभूत सुविधा उभारल्या जात आहेत. स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेने आपण पाऊल टाकले आहे. अप्पर तहसिल कार्यालयही सुरु करण्यात आले आहे त्यामुळे शासकीय आणि प्रशासकीय सुविधा आता थेट जनतेच्या दारापर्यंत पोहचणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.


नळदुर्ग शहरात महावितरणचे नविन उपविभागीय कार्यालय मंजुर झाले आहे. लवकरच ते कार्यान्वित होणार आहे. नळदुर्गच्या विकासाचा खरा प्रवास आता सुरु झाला आहे. तो कधीच थांबु नये यासाठी नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला विजयी करावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. आपण केलेली विकास कामे घेऊन मतदारांसमोर जात आहोत असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी नितीन काळे,विनायक अहंकारी, दत्तात्रय दासकर, बसवराज धरणे, रीजवान काझी, ज्ञानेश्वर घोडके,शिवाजी गायकवाड यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक अहंकारी यांनी केले. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन डुकरे यांनी आपल्या समर्थकांसह आमदार पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य नितीन काळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, ॲड. दीपक आलुरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top