धाराशिव (प्रतिनिधी)- रुईभर ता. धाराशिव येथील  विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दरवर्षी एकास संधी अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे धनंजय चव्हाण यांची चेअरमन म्हणून तर सौ निलावती रोहिदास वडवले यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी डॉ . आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगवानआबा गुलाबगिरी महाराज यांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक शिवाजी पवार, आगतराव भोईटे राजाराम कोळगे, रामदास कोळगे, शशिकांत कोळगे, बालाजी कोळगे, पांडुरंग कोळगे, नवनाथ गव्हाणे, मारुती कस्पटे, हरिदास गव्हाणे, पांडुरंग आगळे, बाबासाहेब कोळगे, नानासाहेब पवार, शाहूराज मते, राजेंद्र गव्हाणे, अशोक सिरसाठे, दत्तात्रय बनसोडे, अशोक गव्हाणे, दशरथ कस्पटे, अमर भोईटे, महादेव शिंपले, बालाजी वडवले, प्रशांत कोळगे, बालाजी चव्हाण, संजय भोईटे, महादेव मते, सचिन गव्हाणे, दिलीप कोळगे, संपत वडवले, अमोल कलाल, तेजसिंह कोळगे, ओंकार कोळगे, नवनाथ शेरखाने यांची उपस्थिती होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.आर सय्यद तर सहाय्यक म्हणून नानासाहेब कदम यांनी कामकाज पाहिले.

 
Top