उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा नगर परिषद 2025 निवडणूकीत मंगळवार दि. 11 नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे वतीने दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यात प्रभाग क्रमांक 11 ब मधून फरहीन खाजा मुजावर व प्रभाग क्रमांक 11 अ मधून सचिन सूतके यांनी प्रभाग अकरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, शहराध्यक्ष विजयजी दळगडे, जिल्हा सचिव विजय वाघमारे, अभिमन्यू भोसले, बाबा मस्के, आदिसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


 
Top