भुम (प्रतिनिधी) सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीची नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी देऊन दिवाळी गोड करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, या थापाड्या सरकारने मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात फुटकी कवडीही टाकली नाही. त्यामुळे ऐन सणासुदीत शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली गेली आहे. दिवाळीनंतर आठवडा सरला तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळल्याने लबाड सरकारचा बुरखा टराटरा फाडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण मराठवाड्यात 5, 6, 7 व 8 नोव्हेंबर रोजी 'दगाबाज रे' संवाद दौऱ्यावर येत आहेत. या झंझावाती दौऱ्याच्या माध्यमातून ते संकटात पिचलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत दि. 5 रोजी भूम तालुक्यातील पाथरूड व परंडा तालुक्यातील शिरसाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे यांनी केले आहे
शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून या संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, दौऱ्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, धाराशिव जिल्हासंपर्कप्रमुख सुनीलज काटमोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. गावागावांत जाऊन चावडी, पारावर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यात शेतकऱ्यांकडून सरकारचे पॅकेज मिळाले की नाही?, सरकारची मदत मिळाली की नाही, याची माहिती घेतील.बुधवार, 5 नोव्हेबर रोजी उद्धव ठाकरे हे दुपारी 2 वाजता धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाध्रुड, दुपारी 3.30 वाजता परंडा तालुक्यातील शिरसाव, सायंकाळी 5 वाजता सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील घारी, सायंकाळी 7 वाजता धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात विश्रामगृहामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीला संबोधित करणार आहे धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील व मुक्काम करतील.गुरुवार, 6 रोजी सकाळी 10 वाजता धाराशिव तालुक्यातील करंजखेडा, दुपारी 12 वाजता लातूरच्या औसा तालुक्यातील भुसणी, दुपारी 2 वाजता अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी, दुपारी 4 वाजता नांदेडच्या लोहा तालुक्यातील पार्डी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी 7 वाजता भोकर येथील तलाव रिसॉर्ट येथे नांदेड व हिंगोली जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मुक्काम करतील.तरी शिवसेना पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भूम परांडा वाशी विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे यांनी केले आहे.