भुम (प्रतिनिधी)- भूम शहरातील ज्योतीराम बाबर यांची रत्नागिरी येथे (विद्युत सहाय्यक) पदी निवड झाल्याबद्दल आणि वैष्णवी बाबर यांची विभागीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल व राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय, भूम येथे राज्य परिषद सदस्य भाजपा बाळासाहेब काका क्षीरसागर, तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर आणि शहराध्यक्ष बाबासाहेब वीर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी, सरचिटणीस आबासाहेब मस्कर, व्यापारी आघाडी सहसंयोजक चंद्रकांत गवळी, तालुका सैनिक आघाडी अध्यक्ष हेमंत देशमुख, शहर युवा मोर्चा अध्यक्ष मुकुंद वाघमारे,तालुका प्रसिद्धी अध्यक्ष शंकर खामकर, तालुका आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष बन्सी काळे, तालुका उपाध्यक्ष सागर शिंदे, प्रदीप साठे, शहर सोशल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, शहर प्रसिद्धी प्रमुख आकाश शेटे,सामाजिक कार्यकर्ते उमेश ढगे,मोहन बाबर, विश्वदीप चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
