धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पक्षाचा उमेदवार निश्चित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने मंजुषा विशाल साखरे यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र  धूरगुडे आणि इतर  पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला अर्ज सादर केला. यावेळी प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, जिल्हा प्रवक्ता ॲड.विशाल साखरे, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जाधव, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अराफत काझी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यामुळे धाराशिव मधील राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. मंजुषा साखरे यांच्या उमेदवारीमुळे आता नगरपालिका निवडणुकीतील समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साखरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आपला उमेदवार सर्वाधिक बहू मताने निवडून आणू असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

 
Top