धाराशिव (प्रतिनिधी)- अविष्कार 2025-26 इंटर युनिव्हर्सिटी झोनल लेवल प्रकल्प सादरीकरण लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते. तेरणा अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर येथील अविष्कार 2025-26 या उपक्रमा अंतर्गत 17 नवीन प्रकल्प सादर करून झोनल लेव्हलवर सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

अविष्कार मध्ये पारितोषिक मिळण्याची दरवर्षीची परंपरा कायम ठेवत. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थी त्यामध्ये पीजी लेवलमधून सक्राते ऐश्वर्या (कॅटेगरी-कॉमर्स,मॅनेजमेंट अँड लॉ), अंकिता शिंदे (कॅटेगरी- अग्रिकल्चर अँड ऍनिमल हसबंडरी), अर्चना उडाणे (कॅटेगरी- ह्युमॅनिटीज,लैंग्वेज अँड फाईन आर्ट्स),अनुराधा पवार(कॅटेगरी-प्युअर सायन्सेस) यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे तर लेवल युजी मधून सायली साळुंखे (कॅटेगिरी-मेडिसिन अँड फार्मसी) हीने प्रथम क्रमांक मिळवला असून द्वितीय क्रमांक आशिष थोरात (कॅटेगरी- इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी), दीक्षा मस्के (कॅटेगिरी- ह्युमॅनिटीज,लैंग्वेज अँड फाईन आर्ट्स) यांनी मिळवला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची पुढील युनिव्हर्सिटी लेवल सादरीकरणासाठी निवड झाली आहे. महाविद्यालयात करत असलेल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग या सर्व प्रोजेक्टचे रूपांतर स्टार्टअप मध्ये करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.विक्रमसिंह माने यांनी केले.

अविष्कार 2025-26 चे समन्वयक व डी.आर.एन डी. डॉ.सुशीलकुमार होळंबे,सह समन्वयक प्रा. रवींद्र गुरव, प्रा.डी.बी ठाकूर, प्रा.डी.बी भक्ते, प्रा. बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे, प्रा.व्ही.एस. बोंदर ,डॉ.आर.बी.ननवरे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या प्रशासनाने तसेच ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा गणेश भातलवंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

 
Top