तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मारूती ढेकणे सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

मारूती ढेकणे यांचा सत्कार राजश्री शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष एम.डी.देशमुख, गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौदागर पांगरकर,यावेळी उपशिक्षणाधिकारी मधुकर तोडकर,तेर केंद्राचे केंद्र प्रमुख राजाभाऊ पडवळ,काजळा केंद्राचे केंद्र प्रमुख एस.एस.घोगरे, व्ही.ई.पांचाळ,पी.एन.चव्हाण,एन.बी.ताटे,सी.एन.क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस.नागटीळक यांनी केले.

 
Top