तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरहून तेर येथे आगमन झाल्याने ग्रामसेवा संघ यांच्या वतीने श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिर परिसरातील तेरणा नदीच्या दगडी घाटावर दिपोत्सव साजरा करण्यात आला. दिपोत्सवाचे नयनरम्य दृश्य पहाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी केली होती.दिपोत्सवाचा शुभारंभ हनुमंत हेगडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
