तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयामधील वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये वैष्णवी देवकते, ओंकार धुमाळ, आकाश कोकरे, श्रुती सुतार, राधा गोरे, तनुजा साळुंके या विद्यार्थिनींचा वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झाल्यामुळे विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बेदरे जे .के. होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बालाजी खराडे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अविनाश पाडूळे, चंद्रकांत कोळेकर,पवन भंडारे, नारायण साळुंखे, राजेंद्र धुमाळ, सचिन देवकते होते. यावेळी मान्यवराच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी डॉ. बालाजी खराडे, सचिन देवकते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चव्हाण एल. टी .यांनी केले सूत्रसंचालन कांबळे बी. डी यांनी केले. तर आभार बळवंतराव एस. एस. यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शितोळे एम. एन.,काणेकर एम. बी.,कोळी एस. टी.,सुधीर कोकणे,गोडगे एस. यु., रणदिवे ए. एन., माधुरी लकडे, भक्ते मॅडम, भंडारे व्ही. एम.यांनी परीश्रम घेतले.
