तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताह निमित्ताने आयोजित मराठाकालीन शस्त्र प्रदर्शन पहाण्यासाठी नागरीकानी गर्दी केली होती.

बार्शी येथील माधवराव देशमुख यांच्या खाजगी संग्रहालयातील मराठकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.मराठाकालिन शस्त्राचे प्रदर्शन पहाण्यासाठी तेर येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तेरच्या सरपंच दिदी काळे या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी गोरख माळी,नवनाथ पांचाळ,शरद सोनवणे, निकीता थोरात, दिपाली नाईकवाडी,अविनाश राठोड, भाग्यश्री बिराजदार, अमोल सावंत, अजित कदम, किशोर काळे, गिरीश चवरे, सविता बागडी, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.


 
Top