धाराशिव (प्रतिनिधी)-  एका महिलेवर दुष्कर्म करून तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपीस धाराशिवच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 17 हजार रूपये दंडाची शिक्षा आरोपी सुरज बाबू लातुरे पठाण यास सुनावली आहे. यावेळी सरकारी अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद व सरकारी पक्षाचे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 

पीडीत महिलेने तुळजापूर पोलिस ठाण्यातया प्रकरणी फिर्याद दिली होती. दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी पीडितेच्या मैत्रिणीने तिला नवीन कामाच्या ठिकाणी नेण्याचे सांगून पाटोदा येथे नेले. तेथे त्यांनी मुदतशीर शेख नावाच्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होवू शकला नाही. सायंकाळी 7 वाजता संपर्क झाल्यानंतर मुदतशीर शेख आणि सुरज पाठण हे दोघे तिघे आले. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पीडिता आरोपी सुरज पठाणच्या दुचाकीवर तर तिची मैत्रीण मुदतशीर शेखच्या दुचाकीवर बसून तुळजापूरकडे निघाले. यावेळी सुरज पठाण याने वडगाव पाटीजवळील खडी मशीनजवळ थांबवून पीडितेला मारहाण करत अत्याचार केला. घटनेची कोठे वाच्यता केल्यास पीडितेस व तिच्या मुलाला ठार मागण्याची धमकी दिली. तसेच नातेवाईकांची बदनामी करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. यावरून तुळजापूर पोलिसात पठाण विरोधात गुन्हा दाखल झाला होता. 

 
Top