भूम (प्रतिनिधी)-  दगाबाज रे..सरकार पॅकेजचे काय झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील पाथरुड व उळूप येथील ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला व प्रत्यक्ष मदत मिळाली की नाही याचा पंचनामा केला. अतिवृष्टी झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी भुम परंडा वाशी या भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर सरकारने दिलेली मदत मिळाली की नाही हे त्यांनी शेतकऱ्यांना विचारून दगाबाज सरकारचा पंचनामा केला. 

यावेळी माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आनंदाचा शिधा, लाडकी बहीण योजना निवडणूकीसाठी जाहीर केलेल्या आहेत असे सांगून सरकारवर टिका केली.जांब येथील शेतकरी अनिल भोरे यांनी शेतकऱ्यांची व्यथा ठाकरे यांच्या समोर मांडली.  यावेळी डॉ .चेतन बोराडे, अब्दुल सय्यद, प्रल्हाद आडागळे, कोहिनूर सय्यद, जिनत सय्यद, दिलीप शाळू,यांच्यासह पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.



फसवणूक सरकार

मी थेट लोकात जाऊन बोलत आहे. मी राजकारण करायला आलो नाही. शेतकरी यांना न्याय दयायला आलो आहे. सरकार फसवणूक करीत आहे. इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे. जमीन खरडून गेली तरी पैसे मिळाले नाही, पॅकेज मोठे जाहीर केले मात्र पैसे दिले नाहीत, पॅकेजला भोक पडली का, ?सरकारला लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल उध्दव ठाकरे यांनी उपस्थित करून टिका केली.  शेतकरी उध्वस्त झाला आहे, पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, 2-3 रुपये असे मिळाले आहेत. विमा भरताना जि रक्कम भरली ती सुद्धा मिळाली नाही. विमा कंपनी वरती मागे मोर्चा काढला होता, शेतकरी यांची ही फसवणूक असुन थट्टा आहे, शेतकरी यांच्या पावत्या गोळा करा, 15 दिवसात विमा कंपनाना जाब विचारा शेतकऱ्यांना विमाचे पैसे मिळवून द्या. फसलं विमा योजना नावातच फसलं तुम्ही फसलात,शिवभोजन बंद, आनंदाचा शिधा दिला नाही. यावरही ठाकरे यांनी टिका केली. 

 
Top