परंडा (प्रतिनिधी)- सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील वागेगव्हाण येथील गावातील लोकांची घरे वाहून गेली घरातील साहित्य वाहून गेले त्यामुळे लोकांचे जीवन विस्कळीत झाले.

पावसाच्या पाण्याने सर्व शेती घरातील अन्नधान्य वाहून गेले त्यामुळे लोकांना खाण्याची राहण्याची व आपल्या आरोग्याची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली याची जाणीव ठेवून रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश कांबळे सचिव मीही का देसाई प्रशासकीय व दिव्या लांजेकर सचिव रिपोर्टिंग यांनी स्थापन केलेल्या रोटर क्लब कराड या सामाजिक संस्थेने गावातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सर्दी ताप खोकला व सॅनिटरी पॅड्स आरोग्यासाठी औषध साहित्य त्यामध्ये सर्व समाविष्ट विविध औषध गोळ्या व पोषक आहार असलेले किटस देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.            शिक्षण महर्ष गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयाच्या मार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली  वागेगव्हाण येथे जाऊन हे सर्व साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघेगव्हाण या शाळेमध्ये  शिक्षकांच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पोषक आहार चे किट देऊन (नाचणी सत्व) त्यांना आधार देण्याचे काम महाविद्यालयाने केले आहे. 

 या अगोदरही महाविद्यालयाने पुढाकार घेत सर्व गावातील लोकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. दीपक तोडकरी प्रा.जगन्नाथ माळी यांच्यासह सहकार्यक्रमाधिकारी व महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे ,डॉ.अतुल हुंबे, डॉ. विद्याधर नलवडे ,डॉ.अक्षय घुमरे, डॉ.प्रशांत गायकवाड ,डॉ.सचिन चव्हाण ,डॉ,अरुण खर्डे ,डॉ. गजेंद्र रंदील.डॉ संभाजी गाते व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी  विद्यार्थिनी सर्वांनी मिळून गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना हे सर्व साहित्य वाटप केले

या प्रसंगी शाळेतील शिक्षक शिवाजी शिंदे यांनी गावातील झालेल्या हानीची व्यथा मांडली मुख्याध्यापक कोपनर कांदे ,गायकवाड ,शिवाजी शिंदे सर उपस्थित होते.शाळेतील शिक्षकांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा सन्मान केला शेवटी डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी  उपस्थितांचे आभार मानले.

 
Top