भूम (प्रतिनिधी)- संविधान दिनाच्या निमित्ताने श्री. गुरुदेव दत्त हायस्कूल भूम येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी भूम न्यायालयातून जागृती रॅली काढली. त्या रॅलीला जिल्हा न्यायाधीश धर्माधिकारी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पंडित, डांगे, जाधव तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जोंधळे मॅडम आणि मते मॅडम यांनी हिरवा झेंडा दाखवला. विद्यार्थी व शिक्षक यांचे भूम वकील मंडळाचे अध्यक्ष पंडित ढगे व सदस्य यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सर्व न्यायाधीश आणि वकील मंडळातील सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी मिळून विध्यार्थ्यांच्या विचार रॅलीमध्ये समाविष्ट होऊन संविधानाची जागृती संदर्भात संदेश दिला. त्यानंतर न्यायालयामध्ये सत्र न्यायालयाच्या बिल्डिंग समोर न्यायाधीश व वकील मंडळी आणी कर्मचारी यांना संविधानाच्या प्रती देऊन संविधानाचे संयुक्त वाचन करण्यात आले, तत्पूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश धर्माधिकारी यांनी संविधानाचे महत्त्व सर्वांना सांगितले.
