धाराशिव (प्रतिनिधी)- मानवी जीवन हे समाजात घडते आणि समाजाला सुव्यवस्थित ठेवण्यासाठी असते. कायदा म्हणजे शिक्षा देणारी गोष्ट नव्हे, तर तो अधिकार आणि जबाबदाऱ्याही सांगणारा मार्गदर्शक असतो. त्यामुळे मानवी जीवनात कायद्याने ज्ञान आवश्यक असल्याचे मत माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

धाराशिव शहरातील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कराळे उपस्थित होते.

कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी योगेश मोरे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परिक्षेतून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे येथील आयएलएस लॉ कॉलेज येथे पाच दिवसीय कार्यशाळेत सहभाग नोंदविल्याबद्दल आंचल जानराव, किरण सुरवसे, ृती देवगिरे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयात यावर्षी आयोजित केलेल्या दांडिया स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करण्यासाठी प्रणिता भोसले व गौरी ढोबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. नितीन कुंभार, डॉ. इकबाल शहा, प्रा. व्ही. जी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. योगेश मोरे यांनी महाविद्यालयातील अनुभव आणि विधी क्षेत्रातील करिअर संधी याबद्दल मार्गदर्शन केले. धाराशिव पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कराळे यांनी कायदा आणि तपास या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कायला कृष्ण मूर्ती यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत करत मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. जे. आंबेकर, प्रा. डॉ. एस. डी. कोल्हे, प्रा. के. पी. शिकारे, प्रा. अमोल कुलकर्णी, प्रा. अनुप कवठाळकर, प्रा. अजित शिंदे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी बागल, रोहित क्षीरसागर, आतार बशीर, राहुल ओव्हाळ, आकाश कवडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन ृती देवगिरे यांनी तर आभार प्रा. दीपिका स्वामी यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top