धाराशिव (प्रतिनिधी)- सरदार 150 एकता अभियानाअंतर्गत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा 21 नोव्हेंबर रोजी धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हिरवा झेंडा दाखवत पदयात्रेला सुरुवात केली.

जिल्हा प्रशासन,मेरा युवा भारत कार्यालय उस्मानाबाद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदयात्रा सकाळी 10 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून सुरू झाली.जिल्हाधिकारी कार्यालय,पोलिस अधीक्षक कार्यालय,कोहिनूर हॉटेल, समतानगर,सह्याद्री चौक,महात्मा फुले चौक मार्गाने जिल्हा स्टेडियम येथे सांगता झाली.

या प्रसंगी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी सरदार पटेलांच्या कार्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहिरी पथकाने सादर केलेल्या सरदार पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित पोवाड्याने वातावरण भारावून गेले,तर सांगता राष्ट्रीय एकतेवरील सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.

कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे,शिक्षणाधिकारी दत्तात्रय देवगुडे,शिक्षण विस्तार अधिकारी दतप्रसाद जंगम,तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी,क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते. या पदयात्रेत मेरा युवा भारत कार्यालय, जिल्हा प्रशासन,क्रीडा अधिकारी कार्यालय, विविधशाळामहाविद्यालये,स्थानिक युवा संघटना,एनएसएसएनसीसी स्वयंसेवक, भारत स्काऊट-गाईड तसेच पोलिस विभागाचा उत्स्फूर्त सहभाग राहिला.

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली 2025 हे वर्ष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून देशभर साजरे केले जात आहे.त्यानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान सर्व जिल्ह्यांमध्ये युनिटी पदयात्रा आयोजित करण्यात येत आहेत.त्याच अनुषंगाने ही पदयात्रा  यशस्वीपणे पार पडली. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी वैभव लांडगे,रवि सुरवसे,प्रशांत मते,किशोर भोकरे,सुरेश कळमकर आणि वेंकटेश दंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top