धाराशिव (प्रतिनिधी)- दि.26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त व भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन मतदार जनजागरण समिती व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
रॅलीत संविधान उद्देशिका शिल्प असलेले आकर्षक असा देखावा असुन शाळा नर्सिंग कॉलेज व वारकरी संप्रदाय शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग असुन, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रॅलीच्या मार्गावरील ठिकठिकाणी नागरिक,सामाजिक संस्था यांच्या कडुन संविधान रॅलीचे स्वागत केले जाणार आहे, बार्शी नाका माता जिजाऊ चौक येथुन रॅलीची सुरुवात असुन श्रीपतराव भोसले हायस्कूल,जॉन मलेलु मेमोरियल चर्च,आर्य समाज चौक,अंबाला हॉटेल मार्ग त्रिशरण चौक ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव समोरुन मारवाडी गल्ली,काळा मारुती मंदिर चौक, ताजमहाल टॉकीज रोड माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम चौक,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा,संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व शेजारील फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत रॅलीचा समारोप करण्यात येईल.या रॅलीच्या माध्यमातुन संविधान जनजागृती,मतदान जनजागृती,कायदेविषयक जनजागृतीचे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे,मतदार जनजागरण समिती धाराशिव.सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग धाराशिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव.जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव.व जिल्हा प्रशासन विभाग धाराशिव सह इतरांचा सहभाग असलेल्या या राष्ट्रीय सण उत्सवातील संविधान जनजागृती रॅलीत सहभागी होऊन भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करावे असे आवाहन मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश वाघमारे, सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.