धाराशिव (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन 2025 _26 चा जिल्हा युवा महोत्सव पुष्पक मंगल कार्यालय,धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या युवा महोत्सवात सांस्कृतिक विभागांतर्गत समूह लोकगीत,समूह लोकनृत्य,चित्रकला,कथा लेखन, कविता लेखन,वक्तृत्व तसेच नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) अशा विविध कलेतील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परीक्षक म्हणून प्रा. मिलींद माने, प्रा.डॉ.उमेश सलगर, डॉ.उषा कांबळे, सतिश ओव्हाळ, शशिकांत माने, डॉ. विनोदकुमार वायचळ, प्रा. डॉ. वैभव आगळे, प्रा. सुर्यकांत कापसे, भोसले, गांगुर्डे, डॉ. होळंबे, डॉ. ननवरे, डी.जी.वाघमारे, समीर माने, डी.सी.पौळ, व्ही.पी. नागापूरे व श्री.एम.ए.चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली.


स्पर्धांचे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे

वक्तृत्व स्पर्धा- प्रथम  जान्हवी केव्हीजी (टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर).द्वितीय  आज्ञाशा पंडा.तृतीय  समीर मजनू शेख (तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव). कथा लेखन- प्रथम  कोळगे स्वरुपा अशोक (तेरणा अभियंत्रीकी महाविद्यालय).द्वितीय  उंबरे किरण सूर्यकांत (श्रीपतराव भोसले मावउमावि,धाराशिव).तृतीय  आदमिले वैष्णवी धर्मराज (व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय).

कविता लेखन- प्रथम  सूर्यवंशी वैभवी तानाजी (व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय),द्वितीय  पडवळ वैष्णवी अमरसिंह (श्रीपतराव भोसले मावउमावि).तृतीय  वाघमारे वैष्णवी युवराज (छ.संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय,बेंबळी). चित्रकला- प्रथम  गुरु रवि देशमुख (शरद पवार हायस्कूल,धाराशिव). द्वितीय  जगदीश बसवराज सुतार (तेरणा अभियंत्रिकी महाविद्यालय). तृतीय  गौरी हनुमंत सुतार (तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय).

समूह स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे आहे. समूह लोकनृत्य- प्रथम  के.टी.पाटील कॉलेज ऑफ फॉर्मसी, धाराशिव,द्वितीय  श्री तुळजाभवानी सैनिकी मावउमावि,तुळजापूर. समूह लोकगीत- प्रथम  व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, धाराशिव.द्वितीय  के.टी.पाटील कॉलेज ऑफ फॉर्मसी,तृतीय  व्होकेशनल महाविद्यालय,धाराशिव.


नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन)

प्रथम श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर, द्वितीय शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालय,धाराशिव, तृतीय तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव,तृतीय  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालये,शाळा व युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. युवा कलागुणांना व्यासपीठ देणारा आणि सर्जनशीलतेला चालना देणारा हा महोत्सव अतिशय यशस्वीपणे पार पडला.

 
Top