धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील सुंभा येथे मानवी हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांच्या निवासस्थानी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक सत्यशोधक चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुणकुमार उर्फ बाबासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.बैठकीस सुग्रीव कांबळे, राजाभाऊ राऊत, सागरबाई घोडेराव यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बैठकीत मानवाधिकार रक्षण, सामाजिक न्याय, पीडितांना मदत, तसेच तालुका पातळीवर संघटनबांधणी मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर धाराशिव तालुका कमिटीची नव्याने एकमताने निवड करून जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आली आले.
नवीन पदाधिकारी- तालुकाध्यक्ष- जनार्दन वाळवे, तालुका उपाध्यक्ष-कैलास कांबळे, तालुका संघटक- भाऊसाहेब ननवरे, तालुका सचिव सय्यद लतिफ रजाक यांची निवड करण्यात आली आहे. उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मौजे सुंभा (ता. धाराशिव) येथे पार पडलेल्या या बैठकीमुळे तालुक्यातील मानवी हक्कांच्या कार्याला अधिक वेग, बळ व दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
