धाराशिव (प्रतिनिधी)- जीवन जगत असताना अविरत प्रयत्नांची पराकाष्टा करणे ही काळाची गरज आहे. प्रयत्नाला कष्टाची जोड दिल्यास आयुष्यात यश हमखास मिळू शकते असा विश्वास ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमीचे संचालक प्रा. गोविंद जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीपासून सीए फाउंडेशन सारख्या कोर्सेस ना प्राधान्यक्रम दिला पाहिजे. वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना सीए फाउंडेशन, इंटर व फायनल हे तीनही टप्पे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. सदर मोटिवेशनल मार्गदर्शनासाठी संभाजी सरडे (सीए)यांची विशेष उपस्थिती होती. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी हा वयाच्या 21व्या वर्षी सक्षम पद्धतीने उभा राहू शकतो व अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो असा आत्मविश्वास त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. अभय देशमाने तर आभार प्रा.एस. बी. शिंदे यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख व उप प्राचार्य बी. एस. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
