धाराशिव (प्रतिनिधी)- येडशी येथील जनता विद्यालयातील मुलिना धाराशिव येथील छेडछाड प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अनघा गोडगे यांनी कायद्याविषयी तर आरोग्य विषयी मार्गा दर्शन श्री रोग तज्ञ डॉक्टर दीपिका सस्ते व कांचन मोहिते यांनी मार्गदर्शन केले .
याप्रसंगी मुलींना विविध कायद्यांचे संरक्षण आहे.न घाबरता त्यांनी शाळेत यावे.तसेच काही अनुचित प्रकार घडू लागला की आपल्या पालकांना व शिक्षकांना ताबडतोब कल्पना द्यावी. तसेच शाळेत तक्रार पेटीत आपली तक्रार दाखल करावी.असे आवाहन श्रीमती गोडगे यांनी केले. तर मुलांनाही मुलींची छेड काढणे,पाठलाग करणे किंवा इतर कायद्याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी स्री रोग तज्ञ डॉ दिपिका सस्ते, डॉ.कांचन मोहिते यांनी आरोग्या विषय मार्गदर्शन केले .हा कार्यक्रम धाराशिव येथील आरंभ महिला गृपच्या वतीने आयोजित करण्यात आला ग्रपच्य सदस्या स्वाती चव्हाण, दिपाली चांडक,योगिता अजमेरा, ॲड.राजश्री मोहिते, रेशमा कोचेटा, रचना सारडा,अर्चना पांडे,आरती अजमेरा,सारिका अजमेरा यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशयस्वी होण्यासाठी ॲड राजश्री मोहिते उपमुख्याध्यापक श्री कांबळे,पर्यवेक्षिका श्रीमती नाईकनवरे यां नी परीश्रम घेतले. याप्रसंगी गांधी एजन्सी धाराशिव याच्या वतीने मुलींसाठी सॅनिटरी पॅड वाटत करण्यात आले.
