धाराशिव (प्रतिनिधी)- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जागतिक वारसा सप्ताह निमित्त सहाय्यक संचालक (पुरातत्व), छञपती संभाजीनगर विभाग व पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव, संचलित पर्यटन विकास समिती धाराशिव आणि पुरातत्व विभाग, कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालय महाराष्ट्र संत विद्यालय आणि तेरणा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तेर येथे हेरिटेज वॉकचे आयोजन संपन्न झाले.
तेर हे प्राचीन शहर असुन तेरला ऐतिहासिक असा पुरातत्व पर्यटनाचा वारसा लाभला असुन याची जनजागृती व्हावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत आमचे शहर प्राचीन तगर असा जयघोष करीत प्राचीन तेर याला दुजोरा देण्यात आला. त्रिविक्रम मंदिर,उतरेश्वर मंदिर सह इतर प्राचीन स्थळे व कै.लामतुरे प्राचीन वास्तु संग्रहालयाल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी मार्गदर्शन केले. तर नरहरी बडवे यांनी सुत्रसंचलन केले. आलेल्या मान्यवरांचे प्राचीन स्थळांविषयीचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन वास्तु संग्रहालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे, मार्गदर्शक डॉ अभय शहापूरकर, मार्गदर्शक प्रा.अभिमान हंगरगेकर,उपाध्यक्ष गणेश वाघमारे,कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग, सदस्य राजाभाऊ कारंडे,पुरातत्त्वज्ञ रविंद्र शिंदे,सदस्य विजय गायकवाड,वैभव वाघचौरे,नरहरी बडवे सह पुरातत्व विभाग, पर्यटन विकास समितीचे पदाधिकारी आणि शालेय विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.
