परंडा प्रतिनिधी - तालुक्यातील लोणी येथील श्रध्दा सौदागर टोंपे यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदी नवनियुक्ती झाल्याबद्दल मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने गुरुवार ( दि . 20 ) मराठा सेवा संघ कार्यालयात सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव आशा मोरजकर, सेवानिवृत्त शाखा अभियंता सौदागर टोंपे, अभियंता राहूल रणदिवे, शशिकांत जाधव, देवानंद टकले, अंगद धुमाळ, संघाचे ता. अध्यक्ष गोरख मोरजकर, रविंद्र मोरे, आप्पा काशीद, मनोज कोळगे, समाधान खुळे, गुणेश राशनकर, राजकुमार देशमुख , ठोंगे , धर्मराज गटकुळ, खंडू मोरे, आदि उपस्थित होते. तसेच नितिन गाढवे व गणेश नेटके यांनीही सत्कार केला .महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने तर मुलीमध्ये प्रथम क्रमांकाने टोंपे यांनी यश संपादन केले असून उपविभागीय जलसंधारण अधिकारी (वर्ग-1) पदी निवड झाली आहे.

 
Top