भुम (प्रतिनिधी)- एस.पी.कनिष्ठ महाविद्यालय येथे भूम पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष होमगार्ड अंकुश थोरात यांचा विद्यार्थिनी व प्राचार्य यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
अंकुश थोरात हे भूम येथील बस स्टँड परिसरात अहोरात्र कर्तव्यावर असतात. एस पी कॉलेजला बाहेर गावाहून बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. त्यामुळे बस स्टँड परिसरात विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी थोरात अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक कानगुडे श्रीगणेश उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष शिंदे उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी काटे एम.बी. व डी.डी. बोराडे, वरीष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अनुराधा जगदाळे,सर्व स्टाफ उपस्थित होता. पोलीस निरीक्षक कानगुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य डॉ शिंदे यांनी थोरात यांचे कौतुक केले आणि बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
