परंडा (प्रतिनिधी)- दि.26 नोव्हेंबर 2025 संविधान नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करते असे मत डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी संविधान दिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित केलेल्या संविधान दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे सांस्कृतिक विभाग राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सामूहिकरीत्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, वरिष्ठ प्राध्यापक डॉ.गजेंद्र रंदिल, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.दीपक तोडकरी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत गायकवाड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विशाल जाधव ,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ. विशाल जाधव यांनी मानले.
