धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव सामाजिक संघटना म्हणून गेली बावीस वर्ष धाराशिव मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर अशी एक संघटना म्हणून काम करत आहे. याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्राचे काम वाढवण्याच्या दृष्टीने समितीचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नेमणूक धाराशिव शहरातील श्री गणेश मंगल कार्यालय येथे करण्यात आली.

उमरगा शहराध्यक्ष-किशोर माडजे आणि उमरगा तालुकाध्यक्ष- महेश फंड, लोहारा शहराध्यक्ष-श्री मंगेश गोरे आणि लोहारा तालुका अध्यक्ष श्री हरिदास रवळे 

तुळजापूर शहराध्यक्ष- श्री प्रतीक अंभोरे आणि तुळजापूर तालुका अध्यक्ष- अतिश मिसाळ, कळंब शहराध्यक्ष- श्री ऋषिकेश काळे आणि कळंब तालुकाध्यक्ष- श्री ॲड.  रणधीर देशमुख, वाशी शहराध्यक्ष- श्री विशाल कवडे आणि वाशी तालुकाध्यक्ष- श्री अंकुश मोरे, भूम शहराध्यक्ष- श्री अर्जुन जाधव आणि भूम तालुका अध्यक्ष- श्री प्रशांत शेळके, परंडा शहराध्यक्ष- श्री राहुल आगरकर आणि परंडा तालुकाध्यक्ष- श्री सुरेश घाडगे, धाराशिव शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे आणि धाराशिव तालुकाध्यक्ष श्री बबलू भोईटे यांची शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये एकमताने .निवडी करण्यात आल्या. शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव चे मार्गदर्शक श्री शशिकांत खुणे,  गुंडोपंत जोशी, धर्मराज सूर्यवंशी, ॲड. संजय शिंदे, अमोल पवार, हरिचंद्र आगळे, सुनील मिसाळ, दत्ता साळुंके, हनुमंत तांबे, धनंजय साळुंके, अच्युत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या नियुक्ती देण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top