तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे (पश्चिम विभाग) खंडपीठाचे न्यायिक सदस्य न्या. दिनेश कुमार सिंग यांनी आज सकाळी सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींची ओटी भरत कुलधर्म-कुलाचार पूर्ण केले.

न्या. दिनेश कुमार सिंग हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असून न्यायक्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी काही काळ प्रयागराज येथील औद्योगिक न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. न्यायव्यवस्थेतील दीर्घ सेवेनंतर विविध प्रशासकीय व न्यायिक जबाबदाऱ्या त्यांनी उल्लेखनीय रीतीने पार पाडल्या आहेत. दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी त्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देत सपत्नीक सत्कार केला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, सहायक जनसंपर्क अधिकारी अतुल भालेराव तसेच मंदिर संस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

 
Top