भूम (प्रतिनिधी)- प्राईड इंग्लिश स्कूल, भूम येथे आजी-आजोबा दिन आनंदमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
आजी-आजोबा हे नातवाचे पहिले मित्र असतात. आई-वडिलांसमोर न व्यक्त होणारे नातू आजी आजोबा जवळ मनमुराद मोकळे होतात. तत्पूर्वी आजी आजोबानी आपल्या जुन्या आठवणी जागवून सर्वंना भावनिक केलेफ यावेळी आजी आजोबा यांना विरंगुळा व्हावा व रोजच्या धकाधकीतून निवांत पणा मिळावा यासाठी मनोरंजनात्मक खेळ घेतले यात आजी गटातून श्रीमती कमल देवरे तर आजोबा गटातुन बबन भोळे हे विजयी झाले. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमात मुलांनी आपल्या आजी-आजोबांसोबत वर्गात बसून रंग भरन केल. यावेळी उपस्थित आजी-आजोबांनी शाळेचे वातावरण, मुलांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या प्रेमळ सादरीकरणाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा सुपेकर यांनी तर सूत्रसंचालन दिपीका टकले यांनी केले.शेवटी शाळेच्या वतीने भाग्यश्री डांगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम घेतले.
