धाराशिव(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी शनिवार 8 नोव्हेंबर रोजीत्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन सत्कार केला.

डॉ. शहापूरकर म्हणाल्या की, “डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून सार्थ निवड झाली आहे.ही निवड समविचारी पक्षांना बळकट करणारी आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.


 
Top