धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे आणि यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विभागाची मोहिनी नारायण मेहेर हिने 50 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. कोटा येथील विद्यापीठात होणाऱ्या ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी मोहिनी मेहेर ची निवड झाली आहे.

मोहिनीचे वडिल नारायण मेहेर  स्वतः एक कुस्तीपटू असून ते त्यांच्या तिन्ही मुलींना व मुलाला कुस्तीचे प्रशिक्षण देऊन चांगले पैलवान बनवण्याचे ध्येय मनात घेऊन अथक मेहनत करत आहेत. तिला महाविद्यालयाचे स्पोर्ट्स इन्चार्ज प्रा. रफीक शेख यांनी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, कुस्ती सारख्या क्षेत्रांमध्ये आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची ही दैदिप्यमान कामगिरी पाहून नक्कीच अभिमान वाटतो.  मोहिनी मेहेरच्या  उत्तुंग यशाबद्दल तिचे व तिच्या वडिलांचे तेरणा ट्रस्टच्या प्रशासनाने तसेच  व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, स्पोर्ट इन्चार्ज प्रा. आर एम शेख तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

 
Top