भूम (प्रतिनिधी)-  प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजना घटक 2.0 अंतर्गत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे, जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी) संभाजीनगर, जलसंधारण विभाग धाराशिव, जय बजरंगबली ग्रामविकास मंडळ, भूम यांच्या वतीने धाराशिव कारी येथे दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी पाणलोट जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमांची सुरुवात सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रेरणादायी गिताने करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी पाणलोट पथक प्रमुख, जलसंधारण अधिकारी रुपेश शिंदे, कृषी तज्ञ्‌‍ लक्ष्मीकांत पवार, स्थापत्य अभियंता संकेत भोरे तसेच पाणलोट समिती अध्यक्ष निलम कदम व पाणलोट पदाधिकारी,    प्रमिला जाधव,प्रविण प्रशिक्षक,बाबासाहेब वडवे, सुनिल कांबळे,सुवर्णा पंढरे, पूनम गायकवाड जय बजरंगबली ग्रामविकास मंडळ भूम चे सचिव प्रमोद शेळके हे हजर होते.  पाणलोट विकास घटक 2.0 मध्ये पाणलोट समितीची रचना, अध्यक्ष, सचिव, पाणलोट समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य  यांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षणसाठी पाणलोट समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट सदस्य, शेतकरी गट सदस्य हजर होते.  या प्रशिक्षण दरम्यान पाणलोट पथक प्रमुख, जलसंधारण अधिकारी रुपेश शिंदे साहेब यांनी भेट देऊन पहाणी केली व प्रशिक्षणातील व्यक्तींना मार्गदर्शन केले. पाणलोट प्रकल्प यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व लोकांचा लोकसहभाग महत्वाचा आहे हे समजावून सांगितले.


 
Top