मुरुम (प्रतिनिधी)- अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्या आदेशान्वये विशेष लाभार्थी प्रामाणिकरण द्वारे दिव्यांग, अपंग, परितक्त्या, विधवा, जेष्ठ नागरिक, वयोवृध्द, निराधार, अंत्योदय रास्त धान्य ग्राहक कार्ड धारक यांचे जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे जळकोट तालुक्यातील अतनूर येथील 80 टक्के लाभार्थी प्रमाणीकरण प्रक्रिया शिबिर दि. 13 रोजी गुरुवारी सकाळी पासून ते सायंकाळ पर्यंत यशस्वीरित्या पार पाडले.
या शिबिरामुळे लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत होण्यास मदत झाली. या शिबिरात लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यात आली आणि त्यांच्या नोंदी अद्ययावत करण्यात आल्या. परंतु ही प्रक्रिया सामान्यपणे शिधापत्रिका आणि सार्वजनिक वितरण प्रणालीशी संबंधित आहे. असून या शिबिराचा उद्देश आणि कार्यपद्धती नुसार लाभार्थी ओळख आणि प्रमाणीकरण होतो. शिबिरामध्ये लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली. यावेळी माहिती अद्ययावत करणे, शिधापत्रिका आणि संबंधित योजनांशी संबंधित लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. सार्वजनिक वितरण प्रणालीची कार्यक्षमता सुधारणे: या प्रक्रियेमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक प्रभावीपणे चालण्यास मदत होते. सदरील लाभार्थी प्रामाणिकरण करिता पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिव्यांग, अपंगाच्या घरोघरी, दारोदारी जाऊन बायो तथा मशीनद्वारे लाभार्थी रास्त भाव धान्य कार्डधारकांची प्रामाणिकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड व तहसीलदार राजेश लांडगे यांच्या विशेष आदेशान्वये व सूचनेप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड, तहसीलदार राजेश लांडगे, निरीक्षणाधिकारी अर्पण राऊत, पुरवठा सहाय्यक रविचंद्र गाजरे, पुरवठा ऑपरेटर माधव सातापुरे, कोंडिबा गवळे, विशाल नाटके, वैजनाथ पवार, महाराष्ट्र शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष बी.जी. शिंदे अतनूरकर, रास्त भाव धान्य दुकानदार शिवाजी नारायण कदम माजी सैनिक यांनी विशेष परिश्रम घेतले.
