कळंब (प्रतिनिधी)-  19 वर्षाखालील मुलींच्या तालुकास्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धा विभागाच्या  क्रीडा स्पर्धा तालुका  क्रीडा संकुल, कळंब येथे पार पडल्या होत्या. त्यामध्ये  शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील मुलींच्या संघानी विविध विभागातून आलेल्या मुलींच्या संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची अहिल्यानगर - कोपरगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. 

त्यामध्ये रूपाली कुरंद, श्रावणी कुरंद, प्रांजली भराटे, साक्षी भराटे, वैष्णवी माळी, श्वेता मगर, संस्कृती गल्हार, दिप्ती शिंदे ,ऋतुजा लोंढे, दिव्या निंबाळकर, रूपाली कुणेकर, अपेक्षा जावळे या स्पर्धकाचा सहभाग होता. त्यांना क्रीडा मार्गदर्शक म्हणून सरस्वती वायभासे तसेच प्रा. निलेश माळी, राजाभाऊ शिंदे, अनिल शिंदे सरगव्हाणे, आदिंचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, उपप्राचार्य प्रा. जयवंत भोसले महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सत्कार केला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top