परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील जेष्ठ साहित्यिक ,विचारवंत तुकाराम गंगावणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तर्फे रविवार दि.23 नोव्हेंबर रोजी पुणे येथे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलनात महात्मा फुले जिवणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे.
साहित्यिक तुकाराम गंगावणे यांनी आपले आयुष्यभर जिवन साहित्य, समाजसेवा, अविरत कार्य केले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात मोलाचे काम केल्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी 19 वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नामवंत साहित्यिक किशोर टिळेकर, डॉ.चोरडिया, अवर सचिव राऊत, सुर्यकांत नामगुडे,यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले जिवणगौरव पुरस्कार सहकुटूंब प्रधान करून सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल तुकाराम गंगावणे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
