कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षक विद्यार्थी व शाळा यांच्या प्रमुख मागण्यासाठी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण राज्यामध्ये 2011 पूर्वी सेवेत दाखल शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट देणे (टी ई टी), जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांना 10,20,30 ची आश्वासित योजना लागू करणे, संच मान्यतेतील त्रुटी दूर करणे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या थांबवलेल्या पदोन्नती त्वरित करणे, शिक्षकांना फक्त अध्यापनाचीच काम देणे यासह विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेला आहे. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघ व राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शिक्षक विद्यार्थी व शाळा यांच्या मागण्यासाठी होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मारणे, शिक्षक संघटना समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर काठोळे, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राष्ट्रीय महासचिव म. ज. मोरे, राज्य सरचिटणीस कैलास दहातोंडे, कार्याध्यक्ष किसनराव ईदगे, कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, राज्यचिटणीस भक्तराज दिवाने, धाराशिव जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष आप्पाराव शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उत्तम वायाळ,राजेश हिवाळे छत्रपती संभाजीनगर, विजयकुमार गुत्ते लातूर, बाबुराव माडगे नांदेड, रामदास कावरखे हिंगोली, भगवान भालके जालना, भगवान पवार बीड,यांच्यासह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
